बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (10:46 IST)

Paralympics: अजितने रौप्य आणि सुंदरसिंग गुर्जरने कांस्यपदक जिंकले

javelin throw
भारताचा स्टार भालाफेक पॅरा ॲथलीट अजित सिंगने चमकदार कामगिरी करत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले. अजित सिंगने भालाफेक F46 फायनलमध्ये 65.62 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो केली. तर याच स्पर्धेत सुंदरसिंग गुर्जरने 64.96 च्या मोसमातील सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले. 

या स्पर्धेचे सुवर्णपदक क्युबाच्या वरोना गोन्झालोने पटकावले आहे. त्याने 66.14 मीटर फेक करून थेट सुवर्णपदक पटकावले. 

भालाफेकच्या F46 स्पर्धेत भारताच्या एकूण तीन खेळाडूंनी अंतिम फेरीत भाग घेतला, ज्यामध्ये अजित सिंग आणि सुंदर सिंग गुर्जर यांनी पदके जिंकली. रिंकू पाचव्या स्थानावर राहिले

अजित सिंगने पहिल्या प्रयत्नात 59.80 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 60.53 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात 62.33 मीटर फेक केली.पाचव्या थ्रोमध्ये त्याने 65.62 मीटर फेक करत इशीसह दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक जिंकले. 

सुंदरसिंग गुर्जरने चांगली सुरुवात केली. त्याने पहिल्या प्रयत्नात 62.92 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 61.75 मीटर फेकले. पण नंतर त्याचे तीन थ्रो फाऊल झाले. त्याची सर्वोत्तम थ्रो 64.96 होती आणि तो कांस्य जिंकण्यात यशस्वी ठरला. 
भारताने आतापर्यंत तीन सुवर्णांसह एकूण 20 पदके जिंकली आहेत आणि पदकतालिकेत 18 व्या क्रमांकावर आहे. 
Edited By - Priya Dixit