सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (10:40 IST)

Paralympics: भारतीय बॅडमिंटनपटू नित्या सुमतीने कांस्यपदक जिंकले

Badminton
भारताची युवा शटलर नित्या सुमती सिवनने पॅरिस पॅरालिम्पिक2024 मध्ये पदक जिंकण्यात यश मिळविले आहे. कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात नित्याने इंडोनेशियाच्या रीना मार्लिनाचा 21-14, 21-6 असा पराभव केला. तिने या पूर्वी देखील 11 महिन्यांपूर्वी आशियाई पॅरा गेम्समध्ये (ऑक्टोबर, 2023) कांस्यपदक जिंकले होते
 
बॅडमिंटनमधील सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण पाच पदके मिळाली.पॅरिस पॅरालिम्पिक2024मध्ये भारताने बॅडमिंटनमध्ये चमकदार कामगिरी केली होती. महिला एकेरीच्या SH6 स्पर्धेत, नित्याने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले होते, त्याआधी सुमतीने कांस्यपदक जिंकले होते. पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत, कुमार नितेशने सुवर्णपदक जिंकले, तर उत्तर प्रदेशातील नोकरशहा सुहास एलवाय याने रौप्य पदक जिंकले.याशिवाय महिला एकेरी स्पर्धेत SU5, टी मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळाले

भारतीय बॅडमिंटनपटू नित्या सुमती हिने सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री झालेल्या सामन्यात कांस्यपदक जिंकल्यानंतर भारताच्या एकूण पदकांची संख्या 15 वर पोहोचली आहे. नित्याच्या विजयानंतर भारत एकूण पदकतालिकेत 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या नावावर सध्या तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि सात कांस्यपदके आहेत.
Edited By - Priya Dixit