12 वर्षाचा मुंबईकर रशियात खेळणार
मुंबईकर सुजर कहार हा 12 वर्षाचा मुलगा रशियात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. फुटबॉल फॉर फ्रेंडशीप या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर मुलांसाठी सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतो.
60 देशातील मुले यात सहभागी होत आहेत. त्यात सुजलला स्थान मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना फिफा आणि गझप्रोमच्या सहकार्यांने हा कार्यक्रम होत आहे.
मुलांमध्ये फुटबॉल खेळाचा विकास करणे, सहिष्णुता वाढवणे, विविध देशांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा आदर करणे असा या फुटबॉल फॉर फ्रेंडशीप कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश आहे. यासाठी शालेय स्तरावर घेतलेल्या जस्ट फॉर किक्स् सारख्या निवड कार्यक्रमातून सुजलची निवड झाली.