रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (12:38 IST)

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

vinesh fogat rahul gandhi
सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाल वाढल्या आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे आज काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. या दोन्ही कुस्तीपटूंनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. 

या वर प्रतिक्रिया देत हरियाणातील भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल वीज म्हणाले, विनेशला देशाच्या कन्येतून काँग्रेसची मुलगी व्हायचे असेल तर आमचा काय आक्षेप आहे. काँग्रेस पहिल्यापासून दिवसांपासून कुस्तींपटूच्या मागे असून काँग्रेसच्या भडकावण्यामुळे आंदोलन सुरू आहे. अन्यथा त्यांनी असा निर्णय घेतला. कुस्तीपटूंच्या या निर्णयामुळे हरियाणाच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. 
Edited by - Priya Dixit