Festival Posters

सुकन्या समृद्धी योजना - नियम आणि फायदे

Updated: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (16:08 IST)
 
सुकन्या समृद्धि योजना 2020 चे उद्दिष्ट्ये 
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश्य मुलींना शैक्षणिक क्षेत्रात पुढे करून त्यांच्या लग्नात कुठलीच कमतरता येऊ न देणे आहे. या योजने मार्फत कमी उत्पन्नधारीच्या मुलीच्या शिक्षणास आणि लग्नासाठी लागणाऱ्या खर्चासाठी उपयोगी पडू शकते. ते आपल्या मुलीच्या नावाने खाता कमीत कमी 250 रुपयांनी बँकेत खाते उघडू शकतात. या योजनेमुळे मुलींना प्रोत्साहन मिळून त्या पुढे वाढतील. या योजनांचा मुख्य उद्देश मुलींच्या भ्रूण हत्येस रोखणे आहे.
 
नियम
या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते. 
मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर जमा राशी मधून 50 % रक्कम आणि मुलीचे वय 21 वर्षाचे झाल्यास तसेच मुलीचे लग्न झाल्यास पूर्ण जमा राशी काढता येऊ शकते. 
ह्यात जमा राशी आणि त्यावरील एजन्सीने जमा केलेली व्याज राशी अशे मिळेल. 
ह्याची एकच अट आहे की ही जमा राशी मुलीच्या 21 व्या वर्षी नंतरच मिळेल. 
 
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये धन राशी जमा करण्याची पद्धत 
या योजनेत नकदी धनराशी, डिमांड ड्राफ्टने जमा करता येते किंवा बँकेत कोर बँकिंग सिस्टमने पण हस्तांतरित (ट्रान्सफर) करता येते. नवे खाते उघडविण्यासाठी खातेधारकाचे नाव द्यावे लागणार. या मुळे कोणी ही आपल्या मुलीच्या खात्यात पैसे जमा करू शकेल. 
 
सुकन्या समृद्धी योजनेचे मुख्य घटक 
अधिनियम 1961 कलम यात धारा 80 ने आयकरवर सूट देते आणि उर्वरित राशी परिपक्वतेनंतर मिळेल. 
कमीत कमी 250 रुपये या राशीने खाते उघडू शकतो. 
ही केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेली सर्वात लहान बचत योजना आहे. 
लाभार्थी राष्ट्रीयकृत बैंक, पोस्ट ऑफिस, एसबीआय, आयसीआयसीआय, पीएनबी, एक्सिस बँक,एचडीएफसी, कुठल्याही बँकेत खाते उघडू शकतात.
 
सुकन्या समृद्धी योजनेस लागणारी कागद पत्रे
एकाच वेळी एकाधिक (जुळ्या किंवा तिळ्या) मुलींच्या जन्माच्या पुराव्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
आधार कार्ड
पाल्य आणि पालकाचे छाया चित्र
मुलीच्या जन्माचा दाखला
पॅन कार्ड (अर्जदाराचे)
राशन कार्ड (अर्जदाराचे)
रहिवासी प्रमाण पत्र (अर्जदाराचे)
 
आवेदन फार्म कुठे मिळेल
आपणास या योजनेचा फार्म लिंक वरून डाउनलोड करावा लागणार. फार्म भरून सर्व मुख्य कागदपत्रांना द्यावे लागणार आणि फार्म भरून कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकतात.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली

LIVE: मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली

मुंबईतील चेंबूरमध्ये सहा मांजरे ठार केल्याप्रकरणी आरोपीला अटक

इंडोनेशियामध्ये 240 लोकांना घेऊन जाणारे जहाज उलटले, 130 प्रवासी बेपत्ता आणि सहा जणांचा मृत्यू

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊसाची हजेरी

पुढील लेख
Show comments