बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 जानेवारी 2020 (16:28 IST)

गायत्री मंत्र : महत्त्व, अर्थ आणि फायदे

गायत्री मंत्र मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे. गायत्री मंत्र पापनाशक, पुण्यवर्धक आहे. ह्या मंत्राच्या पठणाने बुद्धीला तेज येणे, स्मरणशक्ती वाढणे, बुद्धी सद्बुद्धी होणे, मेंदूचे विकार, विस्मरण, तोतरेपणा इत्यादी दोष दूर होण्यास मदत होते. हा मंत्र सर्वानीच तसेच शाळेकरी मुली- मुलांनी आवर्जून म्हटले पाहिजे. 
 
गायत्री मंत्र 
 
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
 
ह्या गायत्री मंत्राची देवता ही सूर्य असून त्या मंत्राचा अर्थ असा आहे. 
 
 
गायत्री मंत्राचा अर्थ 
स्वर्ग-मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांत व्यापून असणाऱ्या, श्रेष्ठ परमतत्व श्री सूर्य नारायणाचे आम्ही ध्यान करतो. हे सूर्यदेव आमच्या बुद्धीला श्रेष्ठता आणि उत्तम कर्म करण्यास प्रवृत्त करो.
 
गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सात्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्याना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. तो आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो अशी प्रार्थना यामध्ये करायची असते.
 
लाभ
उत्साह आणि सकारात्मकता वाढते.
त्वचेच कांती येते.
वाईट गोष्टींपासून मनाला मुक्ती मिळते.
धर्म आणि सेवा कार्यात मन रमतं.
पूर्वाभास होऊ लागतात.
आशीर्वाद देण्याची शक्ती वाढते.
स्वप्न सिद्धी प्राप्त होते.
क्रोध शांत होतो.