शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 26 सप्टेंबर 2014 (18:24 IST)

भाजपने युती तोडून हुतात्म्यांचा अपमान केला- शिवसेना

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेशी फारकत घेऊ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचा अपमान केल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अन्य घटकपक्षांवर कडाडून टीका केली आहे. शिवसेना आणि भाजपमधील 25 वर्षांची युती संपुष्टात आल्याने अत्यंत दु:ख झाल्याचेही ठाकरेंनी म्हटले आहे. भाजप आणि घटकपक्षांसोबतची युती टिकवण्यासाठी शिवसेनेकडून अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आला. युती तुटल्यामुळे भविष्यात काय होणार, हे माहित नसल्याचे सांगून सत्तेचे राजकारणामुळे संयुक्त महाराष्ट्राला धोका पोहचू नये, एवढी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

'कालपर्यंत एका तंबूत पाया पडणारे आता दुसऱ्या तंबूत नमाज पडतील', असे सांगत शिवसेनेने घटकपक्षांवरही निशाणाही साधला आहे.