रविवार, 12 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (16:08 IST)

राज ठाकरेंना धक्का, निवडणुकीच्या तोंडावर राम कदम भाजपच्या वाटेवर

विधानसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर आली असताना पश्चिम घाटकोपरचे मनसेचे आमदार राम कदम यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार राम कदम लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. राम कदम पुण्याकडे रवाना झाले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राज कदम गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या नेतृत्त्वावर अर्थात राज ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा होती. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.