शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Updated :मुंबई- , शुक्रवार, 26 सप्टेंबर 2014 (18:28 IST)

शिवसेनेने जाहीर केली मुंबईतील उमेदवारांची यादी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आज (शुक्रवारी) शिवसेनेने मुंबईतील उमेदवारांची यादी जाहीर केली.  गुरूवारी (25 सप्टेंबर) घटस्थापनेच्या दिवशी भाजप आणि महायुतीतील घटकपक्षांनी शिवसेनेसोबत फारकत घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकांत एकट्या पडलेल्या शिवसेनेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील शिवसेना उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे...
रमेश लटके - अंधेरी पूर्व
जयवंत परब - अंधेरी पश्चिम
कांदिवली पूर्व- अमोल किर्तीकर
दिंडोशी - सुनील प्रभू
अजय चौधरी - शिवडी
सुनील शिंदे - वरळी
सदा सरवणकर - माहिम
वांदे पूर्व - बाळा सांवत
दहीसर - विनोद घोसाळकर