शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: कोल्हापूर , शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (11:52 IST)

शिवसेनेने दोन पावले पुढे यावे : शहा

‘बोलावणे आल्याशिवाय ‘मातोश्री’वर जाणार नाही,’ असा पवित्रा आपल्या पहिल्या महाराष्ट्र दौर्‍यात घेणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर नरमले आहेत. 
 
‘जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी आम्ही दोन पावले पुढे आलो आहोत, शिवसेनेनेही दोन पावले पुढे यावे,’ असा विनवणीचा सूर शहा यांनी लावला आहे.
 
शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा कायम असल्याने राज्यातील नेत्यांशी सल्लामसलत करण्यासाठी अमित शहा हे आठवडाभरातच पुन्हा महाराष्ट्रात आले आहेत. गुरुवारी सकाळी शहा यांनी महाराष्ट्रातील त्यांची सासुरवाडी कोल्हापूर येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकत्र्यांना संबोधित केले. यावेळी युतीच्या तिढय़ावरही शहा यांनी भाष्य केले.