सूर्य नमस्काराचे 10 चमत्कार, आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे
सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने 12 योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. ज्याप्रकारे 12 राश्या, 12 महिने असतात त्याच प्रकारे सूर्य नमस्कार देखील आसनांच्या योगाने बनलेले आहे. सूर्य नमस्काराच्या एका पूर्ण चक्रात 12 स्थितींची अनुक्रमात पुनरावृत्ती होते आणि या 12 स्थितींप्रमाणे 12 बीज मंत्र असतात आणि याचे अनेक लाभ आहेत.
पोटाचे स्नायू मजबूत होतात, यामुळे पचन शक्ती वाढते.
शरीराचे जादा वजन कमी करण्यात मदत होते.
आळशीपणा दूर ठेवण्यास मदत होते. मन शांत राहतं.
शरीरात रक्त प्रवाहाचा वेग वाढल्याने ब्लड प्रेशर सारख्या आजारावर आराम मिळतो.
केस अवेळी पांढरे होणे, गळणे तसेच कोड्यांपासून मुक्ती मिळते.
व्यक्तीची धीर धरण्याची क्षमता वाढते.
सहनशीलता वाढविण्यात आणि रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
शरीरात लवचीकता येते ज्यामुळे पाठदुखी आणि पायदुखी पासून मुक्ती मिळते.
नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी मिळत असल्याने हाडे मजबूत होतात आणि दृष्टी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
त्वचा रोग नाहीसे होतात.
सावधगिरी
सूर्य नमस्कार सकाळी शौच केल्यानंतर पूर्व दिशेकडे मुख करून घालावे.
सूर्य नमस्कार करताना शरीराची प्रत्येक क्रिया लक्षपूर्वक आणि आरामात करावी.
ज्ञानाचा अभाव असल्या एखाद्या योग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.