मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 31 मे 2023 (22:56 IST)

योगासन करताना या सावधगिरी बाळगा

yoga clothes
योगासन केल्याने शरीर निरोगी आणि सुदृढ बनतो .परंतु योगासन करताना काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊ या .
 
* योगाभ्यास धैर्याने आणि मन लावून करा. आपले अंग लवचीक नसल्याने आपल्याला योग करण्यास त्रास होऊ शकतो. काळजी करू नका. हळू-हळू सराव केल्याने आसन करणे सहज होईल. 
 
* सुरुवातीला सोपे आसन करा. 
 
* आपल्या शरीरासह बळजबरी करू नका. 
 
* सुरुवातीला आसन करण्याच्या दरम्यान विश्रांती घ्या. 
 
* मासिक पाळीच्या काळात योगासनं करू नका. 
 
* गर्भावस्थेत योग्य प्रशिक्षकांच्या देखरेखी खाली आसन करा. 
 
* खाण्या-पिण्यात संयम बाळगा. वेळच्या वेळी खा. 
 
* मद्यपान आणि धूम्रपान करू नका. 
 
* झोप पुरेशी घ्या. शरीराला व्यायामासह योग्य आहार घेण्याची आवश्यकता असते. तसेच झोप पण व्यवस्थित पाहिजे म्हणून पुरेशी झोप घ्या.  
 
* स्वतःवर आणि योगावर विश्वास ठेवा. सकारात्मक विचारसरणी योगाभ्यासाचे फायदे मिळवून देते.