International Yoga Day 2021 :हे 4 आसन मासिक पाळीच्या त्रासातून आराम देतात

Last Updated: सोमवार, 21 जून 2021 (18:23 IST)
प्रत्येक वर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन जगभरात साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश्य म्हणजे लोकांना योगाबद्दल जागरूक करणे आहे.योगा आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करते. असे अनेक योगासन आहेत ज्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांमधून आराम मिळतो.अशा परिस्थितीत लोक हे योगासन करतात.काही योगासन असे आहेत,जे स्त्रियांच्या मासिक पाळीत होणाऱ्या वेदनेपासून आराम देतात चला जाणून घेऊ या.

1 बटरफ्लाय आसन-या आसनाला बटरफ्लाय किंवा फुलपाखरू आसन म्हणतात.हे केल्याने स्त्रियांना फायदा होतो.या मध्ये आपल्याला पाय समोरच्या बाजूने पसरवून बसायचे आहे.पाठीचा कणा ताठ ठेवायचा पाय गुडघ्यापासून दुमडून ओटीपोटाजवळ आणा दोन्ही हाताने पाय घट्ट धरून ठेवा.टाचा जननेंद्रियांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा.लांब आणि दीर्घ श्वास घ्या.श्वास सोडत गुडघे आणि मांडीवर दाब टाका ज्या प्रकारे फुलपाखरूआपले पंख हलवते त्याच प्रकारे आपल्याला आपले पाय वरखाली करायचे आहे.या दरम्यान पायाला वेगाने हलवा आणि श्वास घ्या नंतर श्वास सोडा.सुरुवातीस हळू-हळू करा नंतर सराव वाढवल्याने आपल्याला अधिकच फायदा मिळेल.

2 मार्जरी आसन-या आसनात आपल्याला पुढे वाकायचे आणि मागे वळायचे आहे.असं केल्याने पाठीच्या कणाला एक ताण होतो.या व्यतिरिक्त पाठ दुखी,कंबर दुखी,आणि मानदुखी मध्ये आराम देण्याचे काम करतो.म्हणून स्त्रियांच्या मासिक पाळीत हे आसन करणे फायदेशीर मानले आहे.

3 वज्रासन-हे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पायाला जमिनीवर पसरवून बसायचे आहे ,हात बाजूला ठेवा. उजव्या पायाच्या गुडघ्याला दुमडून कुल्ह्याच्या खाली ठेवा.त्याच प्रमाणे डाव्या गुडघ्याला दुमडून कुल्ह्याच्या खाली ठेवा.टाचा या प्रकारे ठेवा की पायाचे बोट एकमेकांवर नसावे.आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि या दरम्यान पाठीचा कणा ताठ ठेवा डोळे मिटून घ्या.या अवस्थेत आपल्याला 5-10मिनिटे बसायचे आहे.


उष्ट्रासन-या आसनांमध्ये आपल्याला गुडघ्याच्या मदतीने चटईवर बसायचे आहे आणि दोन्ही हात कुल्ह्यावर ठेवायचे आहे.लक्षात असू द्या की गुडघे आणि खांदे समांतर असावे तळपाय आकाशाकडे असावे.श्वास घेत पाठीचा कणा ताणून घ्या आणि मानेवर कोणताही दाब न देता तसेच बसून राहा.या स्थितीत श्वास घ्या आणि श्वास सोडत पूर्वस्थितीत या.हाताला कंबरेवर ठेवा आणि सरळ व्हा.
यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरील कोर्ससाठी जेटकिंग आणि NEAR ...

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरील कोर्ससाठी जेटकिंग आणि NEAR प्रोटोकॉल यांची भागीदारी!
उच्च पगाराच्या ब्लॉकचेन नोकऱ्यांचे १ लाख तरुणांसाठी ६० मिनिटांचे विनामूल्य प्रशिक्षण

मस्करा लावण्याची योग्य पद्धत, या टिप्स फॉलो करा

मस्करा लावण्याची योग्य पद्धत, या टिप्स फॉलो करा
डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मस्करा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तथापि, अशा अनेक ...

अधोमुख श्वानासन Adho Mukha Svanasana

अधोमुख श्वानासन Adho Mukha Svanasana
भारतीय योगामध्ये अधोमुख श्वानासनाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. अधोमुख श्वान आसान हे ...

या प्रकारे रागावर नियंत्रण ठेवा

या प्रकारे रागावर नियंत्रण ठेवा
जेव्हा ही आपल्याला राग येत असेल तर 10 पर्यंत उलय मोजणी करा. याने मेंदू डिस्ट्रेक होईल आणि ...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आणि ...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आणि चविष्ट ओव्याचे लाडू खा
हिवाळ्यात ओव्याचे लाडू खूप फायदेशीर असतात. हे लाडू रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतातच, पण ...