रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (14:35 IST)

योगसना दरम्यान या चुका केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकत, जाणून घ्या

sthirata shakti yoga benefits
शरीर निरोगी ठेवण्यासाठी, सर्व लोकांना नियमितपणे योगासने आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासन फायदेशीर मानले जाते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की योगाचा रोजचा सराव अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका कमी करू शकतो. मात्र यासाठी केवळ योगा करणे पुरेसे नाही. योग्य मार्गाने आणि नियमांच्या आधारे योगासनांचा सराव करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
 
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्यापैकी बरेच जण योगा करतात पण त्यांना त्याचे फायदे मिळत नाहीत. एवढेच नाही तर इतरही अनेक समस्या यामुळे वाढतात. अशा परिस्थितीत योगाचे फायदे मर्यादित करणाऱ्या चुकांकडे लक्ष दिले पाहिजे.  चला तर मग जाणून घेऊ या. कोणत्या आहे या चुका.
 
1 खूप घट्ट कपडे घालून योगा करू नका - योगा करताना खूप घट्ट कपडे घालत असाल  तर काळजी घ्या. योगामध्ये सर्व स्नायू गुंतलेले असतात, कपड्याच्या घट्टपणामुळे स्नायू नीट प्रसरण पावत नाहीत, त्यामुळे योगाचा पूर्ण फायदा मिळत नाही. म्हणून योगासने किंवा व्यायाम करताना नेहमी सैलसर कपडे घालावेत. आपण असे कपडे देखील घालू शकता जे फॉर्म-फिटिंग आहेत किंवा खूप घट्ट नाहीत.
 
2 योगाचा सराव जास्त वेळ करणे- योग तज्ञांच्या मतेबरेच लोक योगाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तासनतास सतत सराव करतात. ही सवय हानिकारक असू शकते. आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेऊन योग निवडा आणि जोपर्यंत शरीर सहन करू शकेल तोपर्यंतच योगासन करा. दीर्घकाळ योगासने केल्याने अधिक फायदे मिळण्याऐवजी थकवा वाढू शकतो. अतिउत्साहीपणामुळे दुखापत देखील होऊ शकते.
 
3 स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन न करणे -कोणत्याही योगा-व्यायाम करण्यापूर्वी शरीराला व्यवस्थित रित्या स्ट्रेच करणे आणि व्यायाम संपवून शरीराला पूर्ण विश्रांती देणे आवश्यक आहे. सहसा स्नायू शिथिल अवस्थेत असतात, अशा स्थितीत अचानक आसन सुरू केल्याने स्नायू ताणण्याची भीती असते. त्यामुळे योगा-व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराची स्ट्रेचिंग करा. शरीराला विश्रांती देणे देखील खूप महत्वाचे आहे.