suvichar

आकाश मुद्रा योग करण्याचे फायदे जाणून घ्या

Updated: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (22:05 IST)
 
मुद्रा बनविण्याची पद्धत -
आकाश मुद्रा करण्यापूर्वी वज्रासनात बसावं. नंतर अंगठ्याच्या टोकाला मधल्या बोटाच्या टोकाशी जोडा. इतर बोट सरळ ठेवा. ही मुद्रा आकाश मुद्रा आहे.    
 
कालावधी -
या दोन्ही मुद्रा सुरुवातीच्या काळात 1 मिनिटांपासून वाढवून कमीतकमी 5 मिनिटापर्यंत करा. दिवसातून फक्त 3 वेळा असं करावं. सराव झाल्यावर वेळ वाढवू शकता.  
 
दोन्ही आसने करण्याचे फायदे-
1 या मुद्राचा सराव करणाऱ्याला चैतन्य आणि सामर्थ्य मिळते.
2 हे मनाला शांती देतो. मनात सकारात्मक विचार संचारतात.
3 हे केल्याने आज्ञाचक्रात ध्यान लागते.
4 या मुळे हाडे बळकट होतात.  
5 हृदयाचे सर्व आजार दूर होण्यात मदत मिळते.  
6 छातीत दुखण्या पासून  फायदा होतो.
7 कान दुखणे, कान वाहणे इत्यादी त्रास नाहीसे होतात.  
8 हे आसन केल्यानं ऐकण्याची शक्ती वाढते.
9 उच्च रक्तदाबातही ही मुद्रा फायदेशीर आहे.
10 शरीर जाड झाले असल्यास ही मुद्रा फायदेशीर आहे.  
11 शरीराला विषारी घटकांपासून मुक्ती मिळते.
12 वात, पित्त आणि कफामध्ये संतुलन स्थापित होत, परंतु वात प्रकृतीच्या लोकांनी ही मुद्रा करू नये.
13 आकाश मुद्रा केल्यानं शरीरात ऊर्जा येते.
14  मधल्या बोटाला शनीचे बोट मानले आहे. अग्नी आणि शनी एकत्र आल्यावर आध्यात्मिक शक्ती तीव्र होते, जे आध्यात्मिक आणि सांसारिक यशाच्या प्राप्तीसाठी आवश्यक आहे.
 
सावधगिरी- 
* या मुद्रेचा सराव चालता-चालता करू नये.  
* ही मुद्रा जेवताना कधीही करू नये.  
* मुद्रा बनवून कधी ही हाताला उलट करू नये.  
* ही मुद्रा करताना धैर्य बाळगा.  
* वात प्रकृतीच्या लोकांनी ही मुद्रा करू नये. या मुळे गॅस, त्वचेचा कोरडेपणा, संधिवातासारखे त्रास उद्भवू शकतात.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

केस गळतीची ७ कारणे, उपाय आणि योग्य आहार: त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला

नात्यात जोडीदाराचा फोन तपासणे चुकीचे आहे का? समजून घ्या वैयक्तिक स्वातंत्र्य आणि विश्वासाची सीमारेषा

दुकानातील मिठाई आणणे टाळा! घरीच बेसन वापरून १० मिनिटात मोतीचूर लाडू बनवा

Jyeshtha Gauri Pujan Images Wishes in Marathi ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा फोटो

चॉकलेट आणि खोबऱ्याची अप्रतिम जोडी: इन्स्टंट चॉकलेट कोकोनट लाडू Ganpati Naivedyam

पुढील लेख
Show comments