मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. ख्रिश्चन
  4. »
  5. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

ख्रिसमस ट्रीची परंपरा

WDWD
* ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आहे. पण तो साजरा करण्याची सुरवात ख्रिस्तानंतर ४०० वर्षांनी झाली. रोमचा पोप ज्युलियसने पहिल्यांदा २५ डिसेंबरला ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून मान्य केले व तीच ख्रिसमसची तारीख ठरली.

* सातव्या शतकात एका भिक्षूने पहिल्यांदा त्रिकोणी फर वृक्षाचा उपयोग (सुचीपर्णी) सजवण्यासाठी केला. त्रिकोणानी त्याने ईश्वराच्या 'पिता-पुत्र-आत्मा' ह्या विद्यांना जोडले तेंव्हापासून त्रिकोणी ख्रिसमस ट्री चे महत्त्व निर्माण झाले.

* सोळाव्या शतकांत मार्टिन ल्युथर किंग यांनी पहिल्यांदा त्या ट्रिला मेणबत्त्यांनी सजवले. मुलांना आकाशातील चमकते तारे या झाडावर उतरल्याचे दाखविण्यासाठी त्याने असे केले. पुढे मेणबत्त्या लावण्याची प्रथाच झाली.

* जर्मनीचा राजकुमार अलबर्टने १८४१ मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाशी लग्न केले आणि आपल्याबरोबर ख्रिसमस ट्री ची परंपरा इंग्लंडला आणली.

* चौथ्या शतकांत तुर्कस्थानमध्ये एक ख्रिश्चन पादरी होते. त्यांचे नाव निकोलस. त्यांच्या चांगल्या कामाने व मुलांविषयीच्या विशेष जिह्वाळ्याने त्यांना संत ही उपाधी मिळाली. त्यानंतर ते फादर निकोलस संत निकोलस आणि पुढे सांताक्लॉज नावाने ओळखले जाऊ लागले.