मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

येशूला मिळाली गुलाबाची भेट

येशू ख्रिस्ताचा जन्म एका पागेत झाला होता. २४ डिसेंबरच्या त्या रात्री बऱ्याच चमत्कारीक गोष्ठी घडल्या. 'आकाशात एक मोठा तारा उगवणे, तीन ज्ञानी लोकांनी तिथे येऊन त्या छोट्या मुलाला ३ भेटवस्तू देणे. या चमत्कारीक घटनांमुळे आपला मुलगा एक अवतारी पुरूष आहे, यावर मेरी व पिता जोसेफचा पूर्ण विश्वास बसला.

एके दिवशी रात्री जोसेफ अचानक झोपेतून उठला. झोपेत एका देवदूताने त्याला पत्नी व मुलासहित इजिप्तला पळून जाण्यास सांगितले. आपले सामान एका गाढवाच्या पाठीवर बांधून ते तेथून निघाले. पूर्ण दिवसभर ते वाळवंटातून चालत होते. रात्री थोडावेळ विसावण्यासाठी ते एका गुहेत थांबले. हे वातावरण पाहून मेरी घाबरली. तेव्हा एक एक माणूस त्यांच्याजवळ आला. त्यांने या दाम्पत्याला धीर दिला. त्यांच्या बाळाला त्याने एक भेट देण्याची इच्छा वर्तवली.

 ती भेट म्हणजे जेरीकोचा गुलाब. वैराण वाळवंटात एका नैसर्गिक मरुस्थळाजवळ जेरिको नावाचे एक स्थळ आहे. यावरून त्या फळाचे जेरिको असे पडले. या फुलाचे वैशिष्ट्य असे की, ते पूर्ण सुकले तरी त्याला पाणी मिळताच ते परत हिरवेगार होते. ते कधीच मरत नाही. ख्रिसमसच्या वेळी या जेरीकोच्या झाडाला पाणी घालून हा चमत्कार पाहता येतो. याचा अर्थ असा लावला जातो की, मेलेल्यांमध्ये श्रद्घा व भक्तीने प्राण आणतो येतो.