गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. जैन
  3. जैन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

जैन धर्मातील प्रमुख पंथ

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत. दिगंबर आणि श्वेतांबर. दिगंबर पंथाचे मुनी वस्त्र धारण करीत नाहीत. श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात. 

साधारणतः तीनशे वर्षांपूर्वी श्वेतांबरांमध्ये स्थानकवासी ही आणखी एक शाखा निघाली. हे लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. जैन धर्माचे तेरा पंथी, वीसपंथी, तारणपंथी, यापनीय यासारखे आणखी उपपंथ आहेत.

जैन धर्मातील मुख्य पंथ व उपपंथामध्ये काही मतभेद असले तरी भगवान महावीर, अहिंसा यावर सर्वांचा सारखाच विश्वास आहे. दिगंबर पंथीय कडक व्रतांचे पालन करतात. दिगंबर पंथीय लोभ, माया यापासून पूर्णपणे दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

ते भिक्षापात्रही वापरत नाहीत. श्वेतांबर पंथातील मुनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करतात. या सोबतच हातात झाडू व भिक्षा पात्रही वापरतात.