शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (08:57 IST)

योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यावर प्रचार बंदी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचार बंदीची कारवाई केली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयोगाने योगी आदित्यनाथ यांना तब्बल ७२ तास तर मायावती यांना ४८ तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. या दोनही नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ही प्रचारबंदीची कारवाई केली आहे.  १६ एप्रिलच्या सकाळी सहा वाजल्यापासून ही प्रचारबंदी अंमलात येणार आहे. भाषणाच्यावेळी दोन्ही नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.