पुरुषोत्तम महिन्याचे खास मंत्र, आपणास देणार अक्षय पुण्यफल
पौराणिक शास्त्रानुसार पुरुषोत्तम किंवा अधिकमासात भगवान श्रीहरी आणि शंकरजी आणि रामभक्त हनुमानाची पूजा उपासना करणं फारच फळदायी असतं. अक्षय पुण्याची प्राप्ती आणि जीवनातील सर्व त्रास आणि दुःख दूर होण्यासाठी पुरुषोत्तम मासात पुढील या मंत्राचे सतत जाप केले पाहिजे.
अधिकमासाचा हे पावित्र्य मंत्र तेव्हा अधिक पुण्य देतं जेव्हा या मंत्राचा जप करताना पिवळे रंगाचे वस्त्र धारण केलं जातात.
अधिक मासातील सर्वात जास्त प्रभावी मंत्र -
गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणम्।
गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियम्।।
याच बरोबर पूजा, हवन, माहात्म्य ऐकणे, दान करणे देखील फायदेशीर मानले आहेत आणि धार्मिक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्यास मोक्ष आणि अनंत पुण्याची प्राप्ती होते.