शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

अक्षय तृतीयेला या 10 पैकी कोणत्याही एका वस्तूंची पूजा करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्यास आपल्याला वर्षभर कोणतेही आर्थिक संकटे उद्भवणार नाही. या 10 पैकी कोणत्याही एका वस्तूंची पूजा केल्यास वर्षभर आपल्या घरात आनंद, समृद्धी, भरभराट टिकून राहते. घरातील वास्तुदोष संपून यशप्राप्ती होते.
 
1 चरण पादुका- या दिवशी लक्ष्मीच्या सोन्या किंवा चांदीच्या चरण पादुका घरात ठेवाव्यात व त्यांची नियमित पूजा करावी. ह्या मागील कारण असं की जेथे लक्ष्मीचे पाउले असतात तेथे कसलीही कमतरता भासत नाही. असे करणे शक्य नसल्यास आपण रांगोळीने पावलं काढून देखील पूजा करू शकता.
 
2 कवड्या- पूर्वीच्या काळी कवड्यांपासून वस्तू विकत घेतल्या जात होत्या. पण आता ह्याला कोणीही विचारत नाही. पण ह्या कवड्यांमध्ये देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते. फारच कमी लोकांना ठाऊक आहे की कवड्या तंत्र-मंत्रासाठी देखील वापरल्या जातात. याचे कारण असं की देवी लक्ष्मीच्या प्रमाणे कवड्या देखील समुद्रांपासून जन्मल्या आहेत. अशी आख्यायिका आहे की ह्या कवड्यांची नियमित केशर आणि हळदीने पूजा केल्यास लक्ष्मी प्राप्ती होतेच. त्याच बरोबर आर्थिक अडचणीही दूर होतात.
 
3 एकाक्षी नारळ- निसर्गात सहसा तीन डोळे असलेले नारळ आढळतात. पण शास्त्रांप्रमाणे एकच डोळा असलेल्या नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. अक्षय तृतीयेला नारळाला घरात आणून त्याची उपासना केल्याने लक्ष्मीची कृपादृष्टी मिळते.
 
4 पारड्याच्या देवी लक्ष्मी- देवी लक्ष्मीची आपल्या घरात कायमची स्थापना करावयाची असल्यास अक्षय तृतीयेला पारड्याच्या देवी लक्ष्मीची किंवा इतर कोणत्याही शुभ सामग्रीची पूजा केली पाहिजे. 
 
5 कासव- क्रिस्टलच्या कासवाची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते.
 
6 श्री यंत्र- अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री यंत्र ची स्थापना करून त्याची पूजा करावी असं केल्यास आर्थिक अडचणी दूर होऊन लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
 
7 घंटा- चांदीची घंटा अक्षय तृतीयेला घरात ठेवल्याने घरात मधुर संबंध टिकून राहतात. त्याचा येणाऱ्या गोड आवाजाने घरातील लोकांचे संबंध देखील मधुर राहतात. चांदीची शक्य नसल्यास देवघरात असलेल्या घंटाची पूजा करणे देखील प्रभावी ठरेल. 
 
8 शंख- लक्ष्मीच्या हातातील दक्षिणावर्ती शंख देखील फायदेशीर मानला जातो. अक्षय तृतीयावर त्याची उपासना करण्यासाठी पुजेस्थळी ठेवल्याने लक्ष्मी प्राप्ती होते.
 
9 बासरी- या दिवशी घरात बासरीची उपासना केल्याने घरात आर्थिक संपन्नता येते.
 
10 चिकणमातीच्या वस्तू- घरात चिकणमाती पासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तू किंवा पूजेच्या वस्तू ठेवल्यास घरातील नकारात्मक शक्ती नाहीशी होते.