मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (11:02 IST)

अक्षय तृतीया : महत्त्वाच्या 10 खास गोष्टी जाणून घेणे फळदायी ठरेल

अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. हा सण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात साजरा केला जातो. गावातील काही भागात ह्याला आखातीज किंवा आक्खातीज म्हणतात. 
 
चला जाणून घेऊ या महत्त्वपूर्ण 10 गोष्टी
 
1 हा दिवस भगवान नर-नारायणासह परशुराम आणि हय ग्रीव यांचे अवतरण दिवस होय. तसेच परमपिता ब्रहमदेवांचा मुलगा अक्षय कुमार यांचा पण जन्म ह्याच दिवशी झाला होता. बद्रीनारायणाचे दार देखील ह्या दिवशीच उघडले जातात. देवी आई गंगेचा अवतरण पण ह्याच दिवशी झाले.
 
2 या दिवशी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की आजच्या दिवशी जे कोणी काहीही ऐहिक कार्य करेल त्याचे चांगले फळ त्याला मिळतील. ह्याच दिवशी वृंदावनात बाके बिहारीजींच्या देऊळात श्री विग्रहाचे पाय दिसतात. ह्याच दिवशी श्रीकृष्णाला भेटावयास त्यांचे सखा सुदामा गेले होते.
 
3 अक्षय तृतीयेचा दिवशी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, भाजी, फळ, चिंच आणि कपडे दान देणे चांगले मानले गेले आहे.
 
4 कोणतेही नवीन कामांची सुरुवात, खरेदी करण्यासाठी, लग्नासाठी हा दिवस शुभ मानला गेला आहे. सर्व शुभ कार्य करण्याच्या व्यतिरिक्त लग्न, सोन्याची खरेदी करण्यासाठी, नवीन घरी प्रवेश करण्यासाठी, नवे सामान विकत घेणे, नवे उद्योग सुरू करण्यासाठी, वाहन खरेदी, जमिनीची पूजा करणे, सर्व शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस चांगला आणि शुभ मानला गेला आहे. ह्या दिवशीचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक श्रेष्ठ मुहूर्त मानला जातो.
 
5 अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नान, ध्यान, जप, हवन, पितृ तरपण केल्याने पुण्याची प्राप्ती होते. तसेच पिंडदानं केल्याने आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती होते.
 
6 अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवन विष्णू आणि देवी लक्ष्मीची षोडशोपचार पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते. 
 
7 ह्याच दिवशी द्वापर युगाचा अंत होऊन सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली.
 
8 अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेद व्यास आणि भगवान गणपतीने महाभारत ग्रंथाच्या लिखाणाची सुरुवात केली होती. ह्याच महत्त्वाच्या दिवशी महाभारताचे युद्धाची समाप्ती झाली होती.
 
9 अक्षय तृतीया (आखातीज) ह्याला अनंत -अक्षय-अश्रूंना फळदायी म्हणतात. ज्याचा कधीही क्षय होणार नाही त्याला अक्षय म्हटले जाते.
 
10 वर्षातील साडे तीन अक्षय मुहूर्त मानले गेले आहे. ह्यात सर्वात पहिला मान अक्षय तृतीयेचा आहे.