संबंधित माहिती
- हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा
- गावी जाण्यासाठी महिलेला पांढऱ्या कपड्यात गुंडाळले, बिंग उघडं पडलं
- Ram Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक महत्त्व, जाणून घ्या यामागील गूढ
- रामनवमी: श्रीरामाचे 10 मंत्र, महत्त्वासह अर्थ
- Chaitra Navratri 2020 : कठिन पाठ करणे शक्य नसल्यास नवरात्रीत 9 दिवस जपा 1 सोपं मंत्र
जप का करावा जाणून घ्या.....
हिंदू धर्मात जपाला विशेष महत्व आहे. जप केल्यास ते त्वरित फलदायी होतो. जप करताना आपल्या इष्ट देवाचे स्मरण करावे. अन्यथा कोट्यवधी जप करूनही त्याचा कसलाही उपयोग होणार नाही.
जप करीत असताना त्या-त्या दैवतांच्या तेजोवलयात आपण बसलो आहोत व ते दैवत आपल्याला शुभाशीर्वाद देत आहे, अशी भावना करून एकांतात देवापुढे बसून निश्चित मनाने जप करावा.
हा जप माळेवर मोजून करावा, पण जप करताना आपले लक्ष्य इष्ट देवताऐवजी माळेकडेच जात असेल तर अर्ध्या तासात किंवा पंधरा मिनटात किती जप होतो हे एकदा पाहून घेऊन त्याप्रमाणे घड्याळ लावून जप करावा.
जप करताना ताठ बसावे. ओठ न हलविता जप करावा. आजारी व वृद्ध व्यक्तींनी अंथरुणावर पडून जप केल्यास काहीही हरकत नाही. जपामुळे चित्तशुद्धी लवकर होते.
पुढील लेख
