रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Modified: बुधवार, 22 एप्रिल 2020 (10:49 IST)

अक्षय तृतीयाच्या दिवशी हे उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील

मानवी जीवनातील प्रत्येक क्षणांमध्ये काही न काही तरी समस्या उद्भवतातच. कधीतरी त्या अडचणींचे निदान होऊन तरी जातात. पण कधी कधी समस्यांचे निदान आढळत नाही. म्हणून आपण अलौकिक शक्ती ज्याला आपण देव म्हणतो त्या देवाच्या साहाय्याने त्यावर विश्वास ठेऊन जप, पूजा, दानधर्म करतो. त्या देवावर विश्वास ठेऊन आपल्या सर्व अडचणी दूर होतात. 
 
अक्षय तृतीयेला तंत्र-मंत्र सिद्धी, दान-उपासना इत्यादी केल्याने अक्षय लाभाचे पुण्य मिळते. अक्षय तृतीयेचा दिवशी केले जाणारे सोपे उपाय.
 
1 ज्या लोकांचा घरात सुख समृद्धी नांदत नसेल तर किंवा काही ही काम मिळत नसल्यास त्यांनी खालील ह्या मंत्राचा जाप करावा. या मंत्राच्या 51 माळ्या जपाव्यात. नंतर दररोजची 1 माळ करावी जो पर्यंत आपले काम पूर्ण होत नाही. हे जरूर करून बघावे.
मंत्र : - 'ॐ नमो भाग्य लक्ष्म्यै च विद्महे अष्ट लक्ष्‍म्यै च धीमहि तन्नौ लक्ष्मी प्रचोदयात्।।' 
ह्या मंत्राचे हवन, तर्पण, मार्जन, कन्या- ब्राह्मण भोजन केल्याने तसेच वरील दिलेल्या मंत्राचे सवा लक्ष जप केल्याने सर्व सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते.
 
2 ज्यांना हे मोठे मंत्र जाप करण्यास जमत नसल्यास त्यांनी देवी लक्ष्मीच्या एकाक्षरी मंत्र 'श्री' चे जाप करावे. ह्याचे उच्चारण श्रीमं असे केले जाते. ह्या मंत्राचे 12 लक्ष जाप केल्याने लक्ष्मीची कृपादृष्टी मिळते.
 
3 दुकान किंवा कारखान्यामध्ये बढती मिळत नसल्यास किंवा घरात मतभेद होत असल्यास चांदीचा पेटीत शेंदूर ठेवून 11 गोमती चक्र ठेवून वरील दिलेले मंत्राचे जाप करून पैशांचा स्थळी, तिजोरी, किंवा पूजास्थळी ठेवावे. असे केल्याने आपणास लाभप्राप्ती होईल.
 
4 लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी पिवळ्या रंगाचे कापड, पंचमुखी दीवा, स्फटिकांच्या मण्याची माळेने उत्तरीकडे तोंड करून रात्रीच्या वेळेस 'ॐ कमलवासिन्यै श्री श्रियै ह्रीं नम:' ह्या मंत्राचे 108 वेळा जप करावे. आपण हे जप श्री यंत्र किंवा श्री महालक्ष्मी यंत्रा समोर ठेऊन करावे. कमळ गट्टा, दूधापासून बनलेले पदार्थांचा नैवेद्य दाखवावे. 1 माळीने हवन करावे. नंतर या यंत्राला तिजोरी मध्ये ठेवावे. 
 
5 एकाक्षी नारळ आणि दक्षिणावर्ती शंख देखील ठेवता येते. 
 
6 चांदीच्या किंवा तांब्याचा भांड्यात कमळाची पाने लावून त्यावर महालक्ष्मी यंत्र स्थापित करावे. तांदळांना केशरी रंगाने रंगवून त्या यंत्रावर 1- 2  दाणे तांदळाचे वाहत जावे. नंतर पूजा झाल्यावर त्या तांदळांना  एकत्र करून त्याची खीर बनवून प्रसाद म्हणून कुमारीकांना खाऊ घालावी. 
 
प. उमेश दीक्षित