शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : शुक्रवार, 10 मे 2024 (08:52 IST)

Akshaya Tritiya 2024 Tulsi Upay: अक्षय तृतीया दिवशी करा तुळशीचे हे उपाय, घरात राहील पैशांची बरकत

Akshaya Tritiya Par Kare Tulsi Ke Upay: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षची तृतीया तिथिला अक्षय तृतीया साजरी केली जाते. हा दिवस शास्त्र आणि धर्म ग्रंथांमध्ये अद्भुत मनाला जातो. अक्षय तृतीयाच्या दिवशी कुबेर देव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सोबतच, या दिवशी तुळशी पूजा देखील महत्वाची मनाली जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. याशिवाय, जर या दिवशी तुळशीशी जोडलेले काही उपाय केले तर चांगल्या प्रकारे फळ मिळते. चला जाणून घेऊ या अक्षय तृतीय दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय 
 
अक्षय तृतीया 2024 तुळशी उपाय 
तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. अशावेळेला तुळशीचे काही पाने अक्षय तृतीया दिवशी लाल कापडात लपेटून घराच्या तिजोरीत ठेवल्यास यामुळे धनबाधित दोष दार होतील आणि घरात धनसंचार होईल. 
 
तुळशीचे पाने एक मूठ तांदुळासोबत लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये किंवा व्हॉयलेट मध्ये ठेवावे. यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. 
 
जर तुम्ही व्यापार करीत असाल. तर तुम्हाला चांगलेच यश मिळेल. तुम्हाला नवीन व्यापार सुरु करण्याची संधी मिळेल. तुम्हाला चांगल्या प्रमाणात नफा मिळेल. 
 
तुळशीची पूजा केल्यानंतर अक्षय तृतीया दिवशी तुळशीजवळ तुपाचा diva लावावा. तुळशीमध्ये काळे तीळ  चढवावे. असे केल्यास घरात सुख-समृद्धी येईल.
 
तुळशीचे रोप अक्षय तृतीया दिवशी कलावा बांधणे सोपे जाते. या दिवशी तुळशीच्या रोपाला कलावा बांधल्याने ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते आणि माता लक्ष्मीचा वास घरात सर्वदूर राहतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.   
 
Edited By- Dhanashri Naik