Last Modified: लखनौ , गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (11:56 IST)
उत्तर प्रदेशात हाय अलर्ट
आज अयोध्येचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, उत्तर प्रदेशाला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे.
ज्या अलाहाबाद न्यायालयात निकाल सुनावला जाणार आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून, सकाळपासूनच या भागात कडेकोट बंदोबस्त आहे.
न्यायालयात केवळ काही व्यक्तींनाच समावेश दिला जाणार असून, मोबाईल, कॅमेरा यांना न्यायालयात नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मायावतीही परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून, अप्रिय घटना होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे.