निकाल पुढे ढकलण्याची निर्मोहीची मागणी
आज अयोध्येचा निकाल लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता मतभेद समोर येत असून, निर्मोही आखाड्याने हा निकाल तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. अयोध्येच्या प्रकरणावर सुनावणी टाळण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी केली जाणार आहे. आज निर्मोही आखाडा सुनावणी पुढे ढकलण्यासंदर्भात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे, तर निर्णय आजच सुनावण्याची मुस्लिम लॉ बोर्डाची मागणी आहे.