Last Modified: नागपूर , गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (17:40 IST)
निकाल लागला आता वाद नको- भागवत
अयोध्येचा वादग्रस्त निकाल लागल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आनंद व्यक्त केला आहे.न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हा वाद इथेच संपवून सार्यांनी एकत्र येत राम मंदीराच्या पुनर्स्थापनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
तूर्तास निकालाविषयी आपल्याला संपूर्ण माहिती नसल्याने यावर आपण अधिक बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आनंद व्यक्त करताना प्रत्येकाने भान बाळगावे, परस्परातील कटुता कमी करत सर्वांनी राष्ट्र निर्मितीसाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.