शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. अयोध्या
Written By वेबदुनिया|

निर्णयानंतर सुप्रीम कोर्टात जाणार- आडवाणी

आयोध्येचा निकाल येत्या 24 तारखेला जाहीर केला जाणार आहे. या प्रकरणाचा निकाल काहीही लागला तरी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्‍यात येणार असल्याचे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केले आहे.

निकाल लागल्यानंतर देशवासीयांनी शांतता बाळगावी असेही अडवाणी यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर सर्वांकडेच सर्वोच्च न्यायालयात जाण्‍याचा मार्ग मोकळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी कोणत्याही अफवा पसरवू नयेत असेही आवाहन आडवाणींनी केले असून, या प्रकरणाचा निकाल कोणाच्याही बाजूनी लागला तरी सर्वांनी संयमाने घ्यावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.