निर्णय हिंदूंच्या बाजूने लागावा- कल्याण सिंह
लखनौ खंडपीठाला आता या प्रकरणी निर्णय लवकरात-लवकर सुनावण्याची घाई करण्याची गरज व्यक्त करत निर्णय हिंदूंच्या बाजुने लागावा अशी मागणी भाजपचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी केली आहे. निर्णय हिंदूंच्या विरोधात लागल्यास संसदेने कायदा करत या जमीनीवर राममंदीर बांधावे अशी मागणीही कल्याण यांनी केली आहे. आज हायकोर्टाने बाबरी जमीन प्रकरणाचा निकाल सुनावल्यानंतर कल्याण सिंह यांनी ही मागणी केली आहे.