शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. अयोध्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 23 सप्टेंबर 2010 (08:24 IST)

बल्क एसएमएसवर सरकारची बंदी

अयोध्या निर्णयाला अवघे 24 तास शिल्लक आहेत. देशात शांतता व सुव्यवस्था राखण्‍यासाठी आता सरकारने बल्क एसएमएस व एमएमएसवर बंदी घातली आहे.

ही बंदी 72 तासांसाठी असणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. संचार मंत्रालयाने दिलेल्या आदेशांनुसार देशातील सर्वच मोबाईल कंपन्यांना या संदर्भात सुचना करण्‍यात आल्या असून, देशातील न्यूज चॅनल्सनाही जबाबदारीने वार्तांकन करण्‍याचे आदेश देण्यात आले आहेत.