Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 22 सप्टेंबर 2010 (15:19 IST)
सुनावणी लांबवण्याची याचिका पुन्हा रद्द?
आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील मालकी हक्कांसंबंधीच्या खटल्याचा निकाल पुढे ढकलण्याविषयीची याचिकेवर चर्चा करण्यास आज दिल्ली सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
यापूर्वीही ही याचिका दाखल करण्यात आली होती. निकाल 24 तारखेलाच लागणार असल्याचे स्पष्ट करतानाच न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्याची तूर्तास गरज नसल्याचे म्हटले आहे.
या याचिकेवर नंतर सुनावणी केली जाणार असल्याचेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.