गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. अयोध्या
Written By वेबदुनिया|
Last Updated :अयोध्या , सोमवार, 16 सप्टेंबर 2013 (16:32 IST)

अयोध्या रामाचे जन्मस्थान- न्यायालय

अखेर अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने जाहीर केला असून, ही जागा म्हणजे प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असल्याचे निकालात न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला असून, चार प्रकरणांचा निकाल सुनावण्‍यात आला आहे.

जस्टीस शर्मा यांनी सुट 5 मध्ये ही जागा राम मंदीराचीच असल्याचे मान्य केले आहे. ही जागा हिंदूंचीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुधीर अग्रवाल यांनी या जागी रामचंद्रांचा जन्म झाल्याचे मान्य केले आहे. या जागी रामचंद्रांचा जन्म झाल्याचे त्यांनी आपल्या निकालात म्हटले आहे.

तिसरे न्यायाधीश जस्टीस खान यांनीही या विषयीचा निर्णय दिला असून, त्यांनी या जागेवर तिघांचे शेअर्स मान्य केले आहेत. या जागेवर हिंदूंचा, मुस्लिमांचा तसेच निर्मोही आखाड्याचा दावा त्यांनी मान्य केला आहे.