Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2010 (10:25 IST)
अयोध्येच्या निकालावर विदेशी खेळाडूही खूश
अयोध्येचा निकाल जितका भारतीयांसाठी महत्वाचा होता, तितकेच या निकालाविषयी परदेशी पाहुण्यांमध्येही उत्सुकता होती. कॉमनवेल्थ गेम्स निमित्त अनेक विदेशी खेळाडू भारतात दाखल झाले असून, त्यांनीही न्यायालयाच्या निकालावर आनंद व्यक्त केला आहे.
भारतीयांनी दाखवलेल्या संयमाने आपल्या मनात भारताविषयीचा आदर आणखी वाढल्याचे मत केनियन संघाचे अधिकारी इग्वे तोबियास यांनी व्यक्त केले आहे. गेम्स निमित्त असलेल्या सुरक्षा व्यवस्थांचीही त्यांनी स्तुती केली आहे.
समोआचा खेळाडू कुर्टिस तुलिया यानेही आनंद व्यक्त केला असून, खेळांसाठी तसेच खेळाडूंसाठी करण्यात आलेल्या व्यवस्था चांगल्या असल्याचे त्याने म्हटले आहे.