शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. अयोध्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 28 सप्टेंबर 2010 (14:59 IST)

आता निर्णयाची उत्सुकता- जावडेकर

बाबरी मशिद प्रकरणी निकाल टाळण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आता अलाहाबाद कोर्ट कोणता निर्णय देते याची उत्सुकता असल्याचे मत भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.

जावडेकर यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. हे प्रकरण मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. आता न्यायालयाने याच्या निर्णयाचा मार्ग मोकळा केला आहे.

न्यायालय यावर कोणता निर्णय देते याची पक्षाला उत्सुकता असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर देशात शांतता राखण्याचे आवाहन करण्‍यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.