शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. अयोध्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , बुधवार, 22 सप्टेंबर 2010 (08:40 IST)

आयोध्या निकालाप्रकरणी राज्यात सतर्कता

24 तारखेला आयोध्येच्या एका खटल्याचा निकाल लागणार आहे. या निमित्त राज्यात सतर्कतेचे आदेश देण्‍यात आले असून, 28 तारखेपर्यंत अधिकार्‍यांना सतर्क रहाण्यास सांगण्‍यात आले आहे.

या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पो‍लीसांना सज्ज रहाण्याचे आदेश देण्‍यात आले असून, राज्य सरकारने यासाठी मिशन शांतता सुरु केले आहे.

मुख्‍यमंत्री अशोक चव्हाण, उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मंत्री तसेच अधिकार्‍यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.