कार्यकर्त्यांनी न्यायालयाचा आदर करावा-गडकरी
अयोध्याप्रश्नी न्यायालय जो निर्णय सुनावेल त्याचा सर्व भाजप कार्यकर्त्यांनी आदर करावा असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी मुंबईत केले आहे. कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घ्यावी असे गडकरींनी म्हटले आहे.न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येणार असल्याने सर्वच पक्षांनी न्यायालयाचा निर्णय मान्य करावा असेही गडकरींनी म्हटले आहे.