शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. अयोध्या
Written By वेबदुनिया|

दोन दिवसात लागणार अयोध्येचा निकाल

सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिल्यानंतर आता दोन दिवसांमध्ये अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशिद जमीनीच्या मालकी हक्काचा निकाल अपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने आज रामचंद्र त्रिपाठी यांची याचिका रद्द करत लवकरात-लवकर या संदर्भातील निर्णय सुनावण्‍याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता देशाचे डोळे अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे लागले असून, न्यायालय आपला निर्णय कधी सुनावते ते अद्याप अस्पष्टच आहे.

मागील 60 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने न्यायालयाने याचा निर्णय लवकरात-लवकर द्यावा अशी मागणी या खटल्यातील विविध पक्षकारांनी दिली होती.

यानंतर न्यायालयाने आज या प्रकरणीचा युक्तीवाद ऐकल्यावर आपला निर्णय सुनावला. त्रिपाठी यांची याचिका रद्द करतानाच याचा निर्णय देण्‍याचे आदेश सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद न्यायालयाला दिले आहेत.