Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 28 सप्टेंबर 2010 (15:24 IST)
न्यायालयाचे आभार- रविशंकर प्रसाद
बाबरी मशिद प्रकरणी न्यायालयाने निर्णय देण्याचे आदेश दिल्याने आपण न्यायालयाचे आभारी असल्याचे मत भाजप प्रवक्ते व हिंदू महासभेचे वकील रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतरही चर्चा होवू शकत असल्याने लवकरात-लवकर या संदर्भात निर्णय सुनावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
न्यायालयाने मागील 60 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निकाल देण्याची तयारी दर्शवल्याने आपण न्यायालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचेही प्रसाद यांनी म्हटले आहे.