Last Modified: लखनौ , सोमवार, 20 सप्टेंबर 2010 (16:37 IST)
रामजन्मभूमी प्रकरणी न्यायाधीशच असहमत!
ND
अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी तीन सदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती धर्मवीर शर्मा यांनी आपल्या दोन सदस्यांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाबाहेर सामोपचाराने तोडगा काढून निकालाची तारीख पुढे ढकलावी, ही याचिका फेटाळून निकाल येत्या २४ तारखेला लखनौ न्यायालयात दिला जाणार आहे. मात्र, न्यायमूर्ती धर्मवीर शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हेतर १७ तारखेला देण्यात आलेल्या निकालपत्रावर स्वाक्षरी करण्यासही त्यांनी नकार दिला होता. निकालाच्या शेवटच्या तारखेपर्यंत चर्चा करुन संबंधित पक्षांना मुभा द्यावी, असे शर्मा म्हणाले. खंडपीठातील इतर दोन न्यायाधीशांनी या संदर्भात आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचेही ते म्हणाले.