गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: शनिवार, 14 एप्रिल 2018 (10:45 IST)

आज जयंती बाबासाहेबांची

आज जयंती बाबासाहेबांची 
विश्व विजेत्या घटनाकारांची......धृ
 
सार्वभौमत्व बंधुत्व समता 
प्रस्धापित करण्या समरसता
शोषितांसाठी नवी वाट शोधली
अद्वितीय अशी घटना लिहीली
आज जयंती. ..........1
 
 अस्प्रृशतेच्या खाईत पडलेल्या 
रूढी रिवाजाने बुरसटलेला
व्यसन अज्ञानाने मागासलेला
घडली क्रांती दिन दुबळ्या जनतेत
आज जयंती. .........2
 
धर्मांतर करूनी क्रांती घडवली
प्रज्ञा शिल करूणेचा धम्म दाखवला
जातियतेच्या प्रथेला सुरूंग लावला
विश्व बंधुत्वाचा दिप दाखवला
आज जयंती. .........3
 
राज्य घटना जरी श्रेष्ठ असली
हाल केले तिचे भ्रष्ट नेत्यांनी 
खोटे जातीचे दाखले अन उमेदवार 
आरक्षण ह्या हरामखोरांनी लाटले
आज जयंती.........4
 
आरक्षणावर करती टिका फार
जावई सरकारी आम्हा म्हणती 
सत्तेचा माज उतरला तेंव्हा तर
आरक्षणाची भिक मागायला तयार 
आज जयंती. ..........5
 
सारे काही आहे तरी बाबासाहेब 
आज आम्हांस गरज तुमची आहे
चळवळीत आम्ही शोधीतो
निस्वार्थ निर्भिड सच्चा कार्यकर्ता 
आज जयंती. ........6
 
डाॅ.मिलिंद शेजवळ