1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (11:56 IST)

Lokmanya Tilak Express: मुंबईहून निघालेल्या रेल्वेचे 8 डबे घसरले, 20 जण जखमी

20 people injured after eight coaches of Lokmanya Tilak Express derail near Salagaon
मुंबईहून भुवनेश्वरकडे निघालेल्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून घसरले. या घटनेत किमान 20 जण जखमी झाल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
 
सकाळी सातच्या सुमारास ओडिशातील कटकजवळ सालनगाव आणि नेरगुंडी स्टेशनच्यामध्ये ही घटना घडली.
 
जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
या घटनेनंतर पाच रेल्वेंचं वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.