1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 15 जानेवारी 2020 (12:42 IST)

दहशतवाद्यांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी 12 लाख रुपये मिळाले - देविंदर सिंग

जम्मू काश्मीरमधील पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग यांना दहशतवाद्यांना चंदीगड आणि पुढे दिल्लीला पोहोचवण्यासाठी 12 लाख रुपये मिळाल्याचं कबूल केल्याची बातमी दिली आहे.
 
हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांबरोबर देविंदर सिंग यांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी ही कबुली दिल्याची माहिती महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.
 
देविंदर सिंग यांना निलंबित करण्यात आलं असून त्यांना मिळालेली सर्व पदकं काढून घेण्यात येणार आहेत. त्यात दहशतवादविरोधी कारवायांसाठी मिळालेल्या शौर्यपदकाचाही समावेश आहे. पोलिसांबरोबरच RAW, आणि गुप्तचर संस्थाही देविंदर सिंग यांची चौकशी करत आहेत.