रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (10:05 IST)

अयोध्या: जस्टिस नझीर यांना झेड सुरक्षा

अयोध्या खटल्यात ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठातील न्यायमूर्ती अब्दुल नझीर आणि कुटुंबीयांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.
 
कट्टरवादी संघटना 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'कडून जीविताला धोका असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
 
गृह मंत्रालयाच्या वतीनं CRPF आणि स्थानिक पोलिसांना जस्टिस नझीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचे उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.