शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मे 2019 (13:23 IST)

माझ्या हत्येचे काँग्रेसला स्वप्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसजनांमध्ये इतका मोदीद्वेष आहे की त्यांना माझ्या हत्येचे स्वप्न पडत आहेत. मात्र मध्य प्रदेशाबरोबरच देशातील जनता माझ्या पाठिशी आहे, याचा त्यांना विसर पडला आहे, असं खळबळजनक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. बुधवारी एका प्रचारसभेत मोदी बोलत होते.  
 
काँग्रेस पक्ष घराणेशाही रुजवण्याचं आणि भ्रष्टाचाराचं काम प्रामाणिकपणे करत असून, इतर बाबतीत हा पक्ष अप्रमाणिक आहे. भाजप देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असून, काँग्रेस मात्र घराणेशाहीतील नव्या पिढीच्या प्रगतीसाठी काम करत आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
 
विरोधी पक्षातील अनेकांना पंतप्रधान बनण्याची स्वप्नं पडू लागली आहेत. मात्र त्यापैकी कोणाचीही विरोधी पक्षनेताही बनण्याची क्षमता नव्हती. एका कुटुंबाची 55 वर्षांची सत्ता विरुद्ध चहावाल्याची 55 महिन्यांची सत्ता यातील योग्य काय आहे हे नीट पारखून एकाची निवड करा, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं.