बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (16:28 IST)

बेंगलुरूमध्ये दिसलं सूर्याचं हेलो (Halo) म्हणजेच प्रभामंडळ

बेंगलुरू परिसरात आज (24 मे) सूर्याने खळे केल्याचं पाहायला मिळालं.
एरवी अनेकदा चंद्राभोवती खळे पाहायला मिळते, पण सूर्याचं खळे तसं दुर्मिळ. अशा खळ्याला प्रभामंडळ किंवा इंग्रजीत हेलो (Halo) असेही म्हणतात.
 
आकाशात सुमारे 20 हजार फुटांवर सिरस नावाचे ढग तयार झाले, की असं दृश्य दिसू
या ढगांमध्ये बर्फाचे सूक्ष्म स्फटिक असता, ज्यातून सूर्याची किरणं विशिष्ट कोनातून गेल्यावर प्रकाशाचं अपवर्तन होतं आणि असं दृष्य तयार होतं.
चक्रीवादळानंतर असे ढग अनेकदा तयार होतात. हे फोटो बेंगलुरूच्या जेपी नगर परिसरात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास टिपले आहेत.
 
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
ही घटना समोर आल्यानंतर ट्वीटरवर #Bangalore हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.
 
अश्विन देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटलंय, "22डीग्रींचं सूर्याचे खळे. खूपच सुंदर."
निमिष सुनील यांनी एक व्हीडिओ ट्वीट करत म्हटलंय, "या काळातल्या सर्वोतत्म गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे हे सूर्याचे खळे."
ट्वीटर यूझर अश्विनी केआर यांनी म्हटलंय, "सूर्योभोवती सुंदर असा इंद्रधनुष्य. बंगळुरूला नमन."
अपेक्षा पट्टाशेट्टी यांनी म्हटलंय, "सूर्याभोवती कडे केलेली इंद्रधनुष्य पाहिलंत का?"