रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (18:30 IST)

माझ्या पोटात दुसऱ्या व्यक्तीची विष्ठा ठेवायला मी तयार झालो कारण

रिक डॅलवे यांना तो क्षण आजही आठवतो जेव्हा त्यांनी विष्ठा प्रत्यारोपण संबंधित एका क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. ‘विष्ठाप्रत्यारोपण हा विचारच अजब आहे.” ते म्हणतात.
 
50 वर्षीय रिक यांनी नुकतंच इंग्लंडच्या बर्मिंगम विद्यापीठात विष्ठाप्रत्यारोपण केलं आहे. त्याचा उद्देश प्रायमरी स्केलेरोसिंग कॉलेंजायटिस (PSC) नावाचा एक गंभीर आजार ठीक करण्यासाठी ही ट्रायल घेण्यात आली होती.
 
प्रत्यारोपणाची प्रक्रिया हसतच समजावून सांगत ते म्हणाले, “हा फक्त विष्ठेचा तुकडा नाही. त्यासाठी प्रयोगशाळेत त्याची चाचणी केली जाते.”
 
सध्या रिक यांच्या गंभीर आजाराच्या शेवटच्या टप्प्याच्या यकृत प्रत्यारोपणाशिवाय कोणताच पर्याय नाही. या आजाराने ब्रिटनमध्ये एक लाख लोकांपैकी सहा ते सात लोकांना हा आजार होतो.
 
यामुळे आयुर्मान 17 ते 20 वर्षाने कमी होतं.
आठ वर्षांआधी ते 42 वयाचे असताना त्यांना या आजाराविषयी माहिती मिळाली.
 
ते म्हणतात, “मला खूप टेन्शन आलं होतं. भविष्याचं मला टेन्शन आल होतं. एखाद्या दरीत कोसळल्यासारखा हा प्रकार होता.”
 
विष्ठा प्रत्यारोपण काय आहे?
फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लान्टला (एफएमटी) विष्ठाप्रत्यारोपण असंही म्हटलं जातं. त्याचा वापर अनेक देशांमध्ये क्लिनिकल ट्रायल म्हणून पोटाच्या आजारासाठी केली जाते.
 
त्यासाठी आरोग्यदायी विष्ठादात्यांची तपासणी केली जाते आणि मलाचा नमुना आतड्यातून जीवाणू काढले जातात आणि त्याला पेशंटच्या आतड्यात प्रत्यारोपण केलं जातं. विष्ठाप्रत्यारोपणासाठी कोलोनोस्कोपी, एनिमा किंवा नासोगॅस्ट्रिक ट्युबचा वापर केला जातो.
 
रिक यांनी पीएससीसाठी ज्या चाचण्या केल्या त्याच्या निकालाच्या आधारे हे उपचार केले होते. मात्र देशातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ केअर अँड एक्सलन्सच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सध्या ब्रिटनमध्ये एकाच रोगासाठी अधिकृतरीत्या याची शिफारस केली जाते.
 
क्लॉस्ट्रिडियम डिफिसाईल (सी.डीफ) सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) मध्ये उपचार केले जातात.
 
क्लॉस्ट्रिडिअम डिफिसाईल एक हानिकारक जीवाणू आहे. त्यामुळे जुलाब होऊ शकतात. जे लोक दीर्घकाळ अँटिबायोटिक्स घेतात त्यांना हा आजार होतो.
 
राष्ट्रीय आरोग्य संस्थेला 50 मिलिलीटर एफएमटीच्या सँपलचा खर्च 1684 डॉलर येतो. तज्ज्ञांच्या मते वारंवार खर्च करण्याच्या आणि हॉस्पिलटमध्ये जाण्याच्या खर्चापेक्षा हा खर्च कमी आहे.
 
काही रुग्णांना एफएमटी एकदाच देण्याची आवश्यकता असते.
 
काही रुग्णालये मानवी मलात असलेल्या आरोग्यदायी जीवाणूंनी तयार झालेल्या गोळ्याही देतात.
विष्ठा प्रत्यारोपणाची गरज काय?
ज्या लोकांना प्रत्यारोपणासाठी यकृत. किडनी किंवा हृदयाची गरज असते त्यांना कितीतरी महिने. कधी वर्षांनुवर्षं वाट पहावी लागते.
 
या महत्त्वाच्या अवयवांच्या तुलनेत मानवी विष्ठा विपुल प्रमाणात उपलब्ध असते. काही लोकांना यामुळे अस्वस्थ होऊ शकतात.
 
मात्र रिक यांना विज्ञानावर भरवसा आहे. त्यांची पत्नी आणि मित्रांनीही त्यांना पाठिंबा दिला.
 
रिकच्या मित्रांनी सांगितलं की त्यात लाजण्यासारखं काहीही नाही अशीच माझ्या बायकोची आणि मित्रमैत्रिणींची प्रतिक्रिया होती. “या उपचारामुळे आपलं काम होऊ शकतं तर त्याचा वापर का करू नये?” असं ते म्हणाले.
 
विष्ठा प्रत्यारोपणासाठी विष्ठाबँकेची गरज काय?
बर्मिंगम विद्यापीठातील मायक्रोबायोम ट्रीटमेंट सेंटर (एमटीसी) ही ब्रिटनमधील पहिली थर्ड पार्टी एफएमटी सेवा होती. सी.डीफ रोग झालेल्या शेकडो रुग्णांवर सुरक्षित उपचार करण्यासाठी डॉक्टरांना विष्ठेचे नमुने उपलब्ध करून देत असत.
 
या केंद्रातील दात्यांना एका कडक तपासणीतून जावं लागतं. त्यामध्ये इतिहास, जीवनशैलीचं मुल्याकन आणि रक्त आणि विष्ठा चाचणीचा समावेश असतो.
पूर्ण तपासणी झाल्यावर चांगल्या विष्ठेला - 80 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या फ्रीजरमध्ये 12 महिने साठवावं लागतं. जर एखाद्या रुग्णाला विष्ठा प्रत्यारोपणाची गरज पडली तर फिल्टर केलेल्या गारठवलेल्या विष्ठेला डिफ्रॉस्ट करून सिरींजमध्ये टाकलं जातं.
 
मायक्रोबायोम ट्रीटमेंट सेंटरचे संचालक प्राध्यापक तारिक इक्बाल यांनी बीबीसीला सांगितलं, “ज्या देशात अशी बँक नाही तिथे हे कठीण आहे. पण वास्तविक पाहता गारठवलेल्या एफएमटीचा उपयोग करावा, म्हणजे योग्य लोकांची तपासणी करण्यासाठी वेळ मिळेल.
 
पीएससी आजारात एफएमटीची भूमिका
रिक यांना जो आजार झाला त्यात 70 ते 80 टक्के रुग्णांमध्ये पीएससी, इन्फ्लामेट्री बॉवेल डिसीज, होऊ शकतो. दीर्घकालीन सूज, क्रोहन रोग आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस या रोगांचं वर्णन करण्यासाठी आयबीडी ही संकल्पना वापरतात. त्यामुळे गंभीर पोटदुखी आणि जुलाब होऊ शकतात.
 
रिक यांच्यावर ट्रायल करणारे प्रभारी कन्सलटंट हेपेटॉलॉजिस्ट आणि पोटविकार तज्ज्ञ डॉ.पलक त्रिवेदी यांच्या मते पीएससी का विकसित झाला आहे याची वैज्ञानिकांना अद्याप कल्पना नाही. किंवा आयबीडीशी त्याचा काय संबंध आहे हेही त्यांना माहिती नाही.
 
त्या म्हणाल्या, आम्हाला आरोग्यदायी आतड्यातील मायक्रोबायोटा असलेल्या विष्ठेला पीएससी रुग्णांच्या आतड्यांमध्ये प्रत्यारोपण करून त्यांना असलेल्या यकृत रोगांवर त्याचा काय परिणाम होतो ते बघायचं होतं
 
विष्ठा प्रत्यारोपणासाठी मार्गदर्शक तत्त्वे
इंपिरिअल कॉलेज लंडन येथील पोटविकार तज्ज्ञ डॉ. हॉरेस विलियम्स यांनी एफएमटीच्या मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्यात सहभाग घेतला आहे. ते सांगतात की विष्ठा प्रत्यारोपण हा कोणत्याही रोगासाठी प्राथमिक उपचारपद्धत नाही.
 
एनएचस फक्त सी.डीफ या रोगासाठीच हे उपचार करण्याचा सल्ला देतो यावर त्यांनी भर दिला. इतर आजारांसाठी नाही. इतर आजारांसाठी हे उपचार हवे असतील तर त्यांनी क्लिनिकल ट्रायलला उपस्थित रहावं, जसं रिक ने केलं आहे.
 
याच कॉलेजमधील पोटविकार तज्ज्ञ आणि एफएमटी वर ब्रिटिश सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंटरॉलॉजीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रमुख लेखर डॉ. बेंजामिन मुलीश यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की अनेक लोक स्वत:हून हे उपचार कसे करायचे याचा अभ्यास करताहेत. हे अतिशय धोकादायक आहे.
 
दक्षिण आफ्रिकेतील विटवाटरसँड विद्यापीठातील स्टीव बीको सेंटर फॉर बायोएथिक्स च्या मेडिकल बायोएथिसिस्ट डॉ. हॅरिअट एथरडेज म्हणतात की अनुभवी डॉक्टर आणि योग्य मार्गदर्शक तत्त्वांशिवाय एफएमटी अतिशय धोकादायक होऊ शकतं. विशेषत: गरीब देशात जिथे साधनं आधीच कमी आहेत.
 
या उपचारांमुळे काही लोकांचा मृत्यूही झाला आहे.
 
अमेरिका आणि युरोप यांच्याशिवाय एफएमटीला ब्राझील, दक्षिण आफ्रिका, आणि भारतासारख्या देशात चाचण्यांनंतर लागू करण्यात आलं आहे.
 
काही लोक विष्ठेप्रति असलेली घृणा, तसंच काही सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक समजुतींमुळे हे उपचार करून घेत नाही
 
भारतातील सर गंगाराम हॉस्पिटलमधील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएंटरॉलॉजी आणि पॅनक्रियाटिक बिलियरी सायन्सेसचे डॉ.पीयूष रंजन म्हणतात, “लोक या उपचाराचं नाव काढलं की विचित्र प्रतिक्रिया देतात. त्यांना वाटतं की हे डॉक्टर गंमत करताहेत आणि हे गंभीर नाही.
 
Published By- Priya Dixit