मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जून 2019 (11:02 IST)

सपासोबत जाऊन भाजपला हरवणं शक्य नाही- मायावती

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाखूष असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी समाजवादी पक्षासोबतची आघाडी संपुष्टात आणली आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर मायावतींनी सलग ट्वीट करत सपासोबत यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं.
 
यापुढील लहान-मोठ्या सर्व निवडणुका बहुजन समाज पक्ष स्वबळावरच लढेल, असंही त्यांनी जाहीर केलं. समाजवादी पक्षासोबत आघाडी करून भविष्यात भाजपला हरवणं शक्य होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
 
समाजवादी पक्षाचा कार्यकाळ हा दलित विरोधी होता. सत्तेवर असताना त्यांनी दलितांना सरकारी नोकरीत बढती देण्यामध्ये अनेक अडचणी आणल्या होत्या. तरीही व्यापक विचार करून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असंही मायावतींनी म्हटलं.