1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (12:20 IST)

'छत्रपतींच्या घराण्याविषयी एकही अपशब्द खपवून घेणार नाही'

छत्रपती उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत असे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर यावर राजकारण तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक परिपत्रक काढून छत्रपतींच्या घराण्यासंदर्भात एकही अपशब्द कदापी खपवून घेणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची साताऱ्याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही.
 
त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची साताऱ्याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे.
 
त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे. सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्याबाबत या पत्रकात म्हटले आहे.