शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 16 जानेवारी 2020 (12:28 IST)

'रुपया मजबूत करण्यासाठी नोटेवर देवी लक्ष्मीचा फोटो छापा'

देशातील चलनी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल असा दावा भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
इंडोनेशियामध्ये नोटांवर गणपती देवाचा फोटो आहे याबाबत विचारले असता स्वामी म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी देऊ शकतात. नोटेवर गणपती असल्यामुळे अनेक संकटे दूर होतात. त्यामुळे भारतीय नोटांवरही देवी लक्ष्मीचा फोटो हवा असे ते म्हणाले. मध्यप्रदेशात खांडवा येथे स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत त्यांनी हे विधान केले आहे.